नवी दिल्ली : ग्राहक संरक्षण विभागाने दिल्लीतल्या कांद्याच्या दरांचा आढावा घेण्यासाठी आज उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत ग्राहक संरक्षण सचिव, नाफेड, सफल तसेच इतर संस्थांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. याबाबतीत ग्रेड- A कांद्याची सफल दुकानांमधील किंमत 23 रुपये 90 पैसे प्रति किलोपर्यंत राखण्याचा निर्णय घेण्यात आला.

सरकार साठेबाजी विरोधात कठोर पावले उचलून आवश्यकता पडल्यास किमान निर्यात किंमत लागू करण्याची गरज अभ्यासेल.