नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टाळेबंदीच्या काळात बीड जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीन गरजूंना मदत म्हणून ५ किलो गहू, ५ किलो तांदूळ आणी २ किलो डाळ १ किलो साखर अशी मदत दिली जात आहे.

समाजातील दानशूर व्यक्तींसह इतरांनी या कठीण प्रसंगी आपल्याच बांधवांना मदत करावी, असं आवाहनही संघाने केलं आहे. या मदती बरोबरच संघातर्फे आरोग्य कीट, रक्तदान शिबीर आणि अत्यावश्यक साधनसामुग्री तीन लाख लोकांपर्यंत पोचवली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर इथं पोलीस आणि नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना आमदार रमेश बोरनारे यांच्या वतीनं पाणी बॉटल नाष्ट्याचे पाकीट वाटप करण्यात आले. वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या कांदा मार्केटमध्ये शेतकऱ्यांसाठी निर्जंतुकीकरण कक्षही स्थापन करण्यात आला.