नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत चीन दरम्यान कमांडर स्तरावरील चर्चेची दहावी फेरी आज होणार आहे. पूर्व लडाखमधील नियंत्रण रेषेवर चिनी बाजूच्या मोल्दो येथे ही चर्चा होणार आहे. पॅनगॉंग तलावावरील सैन्य मागे घेण्याच्या प्रक्रीयेनंतर प्रथमच ही चर्चा होत आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हू चुनयिंग यांनी बीजिंगमध्ये माध्यमांना सांगितले की दोन्ही देशाचे लष्करी अधिकारी संवाद साधत असून भारत हा एक महत्त्वाचा शेजारी आहे आणि स्थिर संबंध प्रस्थापित करणे हे लोकांच्या हिताचे आहे. दरम्यान गलवान खो-यात झालेल्या चकमकीत आपले चार सैनिक मारले गेल्याची कबुली पहिल्यांदाच चीनने दिली आहे. मात्र आज होणाऱ्या चर्चेशी याचा काहीही संबध नसल्याचे चुनयिंग यांनी म्हटले आहे.