नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि पाकिस्तान दरम्यान स्थायी सिंध आयोगाची बैठक आज नवी दिल्ली इथं आयजित करण्यात आली आहे. सिंधू नदीच्या पाण्यासंदर्भातील अधिकार या विषयावर ही बैठक होणार आहे. भारताच्यावतीनं या विषयाचे आयुक्त प्रदिप कुमार सक्सेना आणि त्यांचे पाकिस्तानचे समपदस्थ सईद मुहम्मद मेहेर अली शाह सहभागी होणार आहेत.
1960 मध्ये सिंधू नदी पाणीकरारादरम्यान या आयोगाची स्थापना करण्यात आली होती. अफगाण मंत्री अफगाणिस्तानचे परराष्ट्र व्यवहारमंत्री महंमद हनीफ अत्मर यांनी काल भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस.जयशंकर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. अत्मर सध्या भारत दौऱ्यावर आहेत. या दोन नेत्यांमध्ये अफगाणिस्तानमधल्या शांतता प्रक्रीयेबद्दल चर्चा झाली. तसंच, दोन देशांमधल्या सहकार्य आणि विकासावरही चर्चा करण्यात आल्याचं जयशंकर यांनी सांगितलं.