नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फ्रान्सचे माजी अध्यक्ष निकोलस सार्कोझी यांना काल भ्रष्टाचार प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं. सार्कोझी यांनी एका न्यायाधीशाला लाच देण्याचा प्रयत्न केल्याचं न्यायालयात सिद्ध झालं.

त्यांना तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. सार्कोझी २००७ ते २०२१ या काळात फ्रान्सचे अध्यक्ष होते.