नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रशियाचे परराष्ट्र व्यवहारमंत्री सर्जी लावारोव्ह आजपासून दोन दिवसांच्या भारतभेटीवर येत आहेत.

या दौऱ्यामध्ये द्विपक्षीय संबंधांमधील महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा होणार असून त्याबरोबरच आगामी भारत – रशिया वार्षिक संमेलनाच्या पूर्वतयारीचाही आढावा घेतला जाणार आहे.

परस्पर सहकार्य आणि हिताच्या द्विपक्षीय तसच आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही यावेळी चर्चा अपेक्षित असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी काल नवी दिल्ली इथं सांगितलं.

परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांच्याशी लावारोव्ह चर्चा करणार असून त्यानंतर ते ६ आणि ७ तारखेला पाकिस्तानचा दौरा करणार आहेत.