नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणमध्ये करोना विषाणूबाधेची पुष्टी झालेल्या दोन रुग्णांचा काल मृत्यू झाला. या विषाणूबाधेचे हे इराणमधले पहिले बळी आहेत. मरण पावलेल्या दोन व्यक्तींनी कधीही परदेश प्रवास केला नव्हता, अशी माहिती इराणच्या आरोग्य मंत्रालयाच्या संसर्गजन्य आजार विभागाच्या प्रमुखांनी दिली.

हे दोन जण इराणच्या कोम भागात राहणारे ज्येष्ठ नागरिक होते आणि त्यांना रोगप्रतिकारविषयक समस्या निर्माण झाल्या होत्या. कोविद-१९ या विषाणू संसर्गाचे मध्यपूर्व आशियातले देखील हे पहिले  आणि चीनबाहेरचे सातवे आणि आठवे बळी आहेत.