नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आखाती देशात निर्माण झालेलं तणावपूर्ण वातावरण शांत करण्यासाठी भारत महत्त्वाची भूमिका निभावू शकतो, अशी अशा इराणचे परराष्ट्रमंत्री जवाद झरीफ यांनी व्यक्त केली आहे. दिल्ली इथं आयोजित रायसिना संवादात ते बोलत होते. या क्षेत्रातला भारत हा महत्त्वाचा देश आहे, असंही ते म्हणाले.

इराणचे जनरल कासीम सोलेमानी यांच्या हत्येनंतर निर्माण झालेला तणाव शांत करण्यासाठी इराण तयार आहे, पण कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेशी चर्चा करणार नाही, असं ठामपणे त्यांनी सांगितलं. काल ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना भेटले.

भारताला या क्षेत्रात शांती, सुरक्षा आणि स्थिरता हवी आहे, अशी अपेक्षा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्याचं झरीफ म्हणाले.