नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय जनगणना नोंदणी – एन पी आर साठी कोणत्याही प्रमाणपत्र किंवा बायोमॅट्रिक माहितीचं संकलन केलं जाणार नसल्याचं, केंद्रसरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
या जनगणनेसाठी फक्त एक प्रश्नावली असेल, असं गृहमंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. येत्या एप्रिल महिन्यापासून सप्टेंबर महिन्यापर्यंत ही जनगणना चालणार आहे.