नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रतिबंधक लस गर्भवती महिलांसाठी किती सुरक्षित आहे असाही एक प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे, यावरही डॉ. व्ही. के. पॉल यांनी काल भाष्य केलं. गर्भवती महिलांनी तूर्तास तरी ही लस घेऊ नये, लसींच्या चाचण्यांमधून समोर आलेल्या आकडेवारीच्या आधारे डॉक्टर किंवा वैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ञांनी याबाबतची शिफारस केलेली नाही असंही ते म्हणाले. येत्या काही दिवसांत सरकारकडून यावर अधिक स्पष्टता दिली जाईल, तोपर्यंत लोकांना संयम बाळगण्याचं आवाहनही डॉ. पॉल यांनी केलं.