नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नीती आयोग आज भारताचा नाविन्यता निर्देशांकाची दुसरी आवृत्ती सादर करणार आहे. दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून होणाऱ्या या कार्यक्रमांत नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार, आयोगाचे सदस्य व्ही के सारस्वत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत उपस्थित राहणार आहेत. नवसंकल्पनांवर आधारित अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्र सरकारची वचनबध्दता यामुळे अधोरेखित होईल असे नीती आयोगाने जारी केलेल्या निवेदनांत म्हटले आहे.

राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांनी नवसंकल्पांचा वापर करुन रोजगार निर्मिती करण्यावर भर द्यावा या उद्देशानं हा सुचकांक मदत करणार आहे. याची नवसंकल्पनांची ताकद आणि अंमलबजावणीतील तृटी दूर करुन यासाठीच्या सुधारणा सुचवण्यात येणार आहेत. यामध्ये १७ प्रमुख राज्य, १० ईशान्येकडील पर्वतीय राज्य आणि ९ प्रमुख शहरं असलेले राज्य यांच्यादरम्यान सुशासन आणि नवसंकल्पनांची अंमलबजावणीचे परिणाम यांनुसार वर्गवारी करण्यात आली आहे.