भोसरी : शिरुर लोकसभा मतदारसंघाचे दोनवेळा आणि पुर्वीच्या खेड मतदारसंघाचे शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव यांनी संसदेत 15 वर्ष प्रतिनिधत्व केले होते. चौथ्यावेळी आढळराव यांचा संसदेचा मार्ग डॉ. अमोल कोल्हे यांनी रोखला. डॉ. कोल्हे यांना शिरुर, जुन्नर, आंबेगावर आणि खेड-आळंदी मतदारसंघातून चांगले मताधिक्य मिळाले.

भोसरी आणि हडपसर या शहरी भागातून आढळराव यांना मताधिक्य मिळाले. पण, हे मताधिक्य डॉ. कोल्हे यांचे लीड तोडू शकले नाही. त्यामुळे आढळराव यांचा 58 हजार 483 मतांनी पराभव झाला.

शिवाजीराव आढळराव पाटील यांनी विजयी उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. डॉ. कोल्हे हे शिरुर लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्याबद्दल यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छांची पोस्ट फेसबुकपेजवर शेअर केले आहे.