नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने आयोजित केलेल्या सातव्या राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत दिग्दर्शक आणि निर्माता निलेश आंबेडकर यांच्या ‘मुंघ्यार’ या मराठी लघुपटाला  राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. नवी दिल्लीत विज्ञान भवन इथं झालेल्या पुरस्कार सोहळ्यात केंद्रीयमंत्री आर.के.सिंह यांच्या हस्ते निलेश आंबेडकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

एक लाख रुपये, स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. देशभरातून १९० लघुपट या स्पर्धेत सहभागी झाले होते.  हा लघुपट स्वातंत्र्य, समानता आणि समाजातल्या प्रतिष्ठेबद्दलच्या कल्पनांबाबत भाष्य करतो.