नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हिमाचल प्रदेशाच्या कुल्लू जिल्ह्यात आज सकाळी एक खासगी बस खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात किमान १२ जणांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले. सैंजला जाणारी ही बस जंगला गावाजवळ दरीत कोसळली. बचाव पथकानं घटनास्थळी पोहोचून काही जणांना बाहेर काढलं. या दुर्घटनेबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. स्थानिक प्रशासन सर्व ते सहाय्य करत आहे, असं त्यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येकाच्या कुटुंबियांना प्रधानमंत्री राष्ट्रीय निधीतून दोन लाख रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली. तसंच प्रत्येक जखमीला ५० हजार रुपये दिले जातील.