नवी दिल्‍ली : मुंबईत काम करणाऱ्यांना कल्याण-डोंबिवली महापालिकेनं प्रवेश बंदी केली आहे. शुक्रवारपासून त्यांना कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत प्रवेश मिळणार नाही.

मुंबईतल्या सरकारी आणि खासगी रुग्णालयात काम करणारे कर्मचारी आणि मुंबई महापालिकेत काम करणाऱ्यांची सोय मुंबई महापालिकेतर्फे केली जाणार आहे.

तर मुंबईतल्या बँका, खासगी कंपन्या आणि इतर ठिकाणी काम करणाऱ्यांनी स्वतःची राहण्याची सोय मुंबईतच करून घ्यावी असं कल्याण-डोंबिवली महापालिकेनं म्हटलं आहे.