नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भरघोस प्रतिसादामुळे शिवभोजन योजनेचा विस्तार करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार, अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं या योजनेतल्या थाळीच्या संख्येत दुपटीनं वाढ केली आहे. आता ही संख्या 18 हजारावरुन 36 हजार इतकी झाली आहे. यासंबंधीचा शासन निर्णय, सरकारनं आज जारी केला.

त्यानुसार प्रत्येक शिवभोजन केंद्रासाठी असलेलं थाळीचं किमान उद्दिष्ट 75 कायम असून, कमाल उद्दिष्टं मागणीनुसार 150 वरून 200 इतकं वाढवता येईल.