नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोणत्याही हॉटेलला किंवा उपाहारगृहाला खाद्यपदार्थांच्या बिलात सेवा शुल्काची आकारणी करता येणार नाही असं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं काल स्पष्ट केलं. या संदर्भात, ग्राहकांच्या हक्कांचं संरक्षण व्हावं आणि कुठल्याही अनुचित व्यवहाराला पायबंद घालण्यासाठी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण अर्थात CCPA नं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. हॉटेल किंवा उपाहारगृह; हे ग्राहकांना सेवा शुल्क भरण्यास भाग पाडू शकत नाही तर सेवा शुल्क ऐच्छिक, असल्याचं या मार्गदर्शक सूचनांमध्ये स्पष्ट केलं आहे.