नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल नवी दिल्लीमध्ये स्वदेशी बनावटीची शस्त्रास्त्र आणि यंत्रणा भारतीय लष्कराला सुपूर्द केली. फ्युचर इन्फंट्री सोल्जर तसंच अत्यधुनिक अँटी पर्सोनेल माइन, रणगाड्यांसाठी अपग्रेडेड साईट सिस्टीम, हाय मोबिलिटी इन्फंट्री प्रोटेक्टेड व्हेईकल्स आणि असॉल्ट बोट्स या अत्याधुनिक उपकरणांचा यात समावेश आहे. या उपकरणामुळे भारतीय सैन्याच्या कार्यक्षमतेत वाढ होईल असा विश्वास राजनाथ सिंह यांनी यावेळी व्यक्त केला. आत्मनिर्भर भारत अभियाना अंतर्गत सशस्त्र दलांचे अधुनिकीकरण करण्याच्या उद्देशानं संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं ही शस्त्रास्त्र आणि यंत्रणा विकसित केली आहे.