मुंबई : नेदरलँड्चे राजे विलेम-अलेक्झांडर व राणी मेक्सिमा यांच्या उपस्थितीत, भारतभेटीतील एक भाग म्हणून, ‘इंडिया अँड द नेदरलँड् इन द एज ऑफ रीम्ब्रांत’ या प्रदर्शनाचे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, मुंबई इथे उद्घाटन करण्यात आले.

शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, मुंबई व रिज्क्स म्युझियम, ॲमस्टरडॅम यांच्यातील हा एक संयुक्त उपक्रम आहे. शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, प्रदर्शन दालनात दि. १७ ऑक्टोबर २०१९ ते १६ डिसेंबर २०१९ या कालावधीत हे प्रदर्शन नागरिकांसाठी खुले असणार आहे.

शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाचे महासंचालक श्री. सब्यासाची मुखर्जी, माध्यम व विकास रिज्क्स म्युझियमचे संचालक, हेन्द्रीज क्रीबोल्दर व नेदरलँड्चे भारतीय राजदूत गिडो टीलमन यावेळी उपस्थित होते.