नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि अंमलबजावणी संचलनालयानं पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या विरुद्ध कडक कारवाई करत देशभरात मोठ्या प्रमाणात छापे टाकून अनेकांना अटक केली आहे. काल रात्री केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तमिळनाडु, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आणि महाराष्ट्रासह एकूण दहा राज्यांमध्ये NIA नं छापे टाकून संशयितांना ताब्यात घेतलं. विशेषतः केरळमध्ये सुमारे पन्नास ठिकाणी धाड टाकण्यात आली. यावेळी दहशतवाद्यांना आर्थिक सहाय्य पुरवल्याप्रकरणी पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेशी संलग्न असलेल्या शंभर पेक्षा अधिक संशयितांना NIA नं अटक केली आहे.