नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अवकाशात उल्कांचा मार्ग बदलण्याची मोहीम यशस्वी झाल्याचं अमेरिकेने काल जाहीर केलं. डबल अॅस्टेरॉईड रिडायरेक्शन टेस्ट – डार्ट या नावाने सुरु केलेल्या या मोहिमेत अमेरिकेने पाठवलेल्या अंतराळ यानाने एका अवकाशवासी उल्काखंडाला जाणीवपूर्वक धक्का देऊन त्याचा मार्ग बदलला. या उल्काखंडापासून पृथ्वीला काहीही धोका नाही असं अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था – नासाने जाहीर केलं आहे. अवकाशस्थ वस्तूची हालचाल मानवाने बदलल्याची ही पहिलीच घटना असल्याचं नासाचे प्रमुख बिल नेल्सन यांनी सांगितलं.