नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंडोनेशियाच्या सिनार मास पल्प अँड पेपर या कंपनीला महाराष्ट्रात १० हजार ५०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी जमीन वाटपाचं पत्र काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सुपूर्द केलं. रायगड जिल्ह्यात, टप्पा १ साठी ३०० हेक्टर आणि टप्पा २ साठी ६०० हेक्टर जमीन या प्रकल्पासाठी घेतली असून, या प्रकल्पामुळे ७ हजार रोजगार निर्माण होणार आहेत. गेल्या अडीच वर्षांपासून प्रलंबित असलेले सर्व प्रस्ताव आम्ही निकाली काढत असून, महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व गुंतवणूकदारांना आम्ही सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन देतो, असं सामंत यावेळी बोलतांना म्हणाले.