नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डिजिटल साक्षरतेच्या आवश्यकतेचा आज हैद्राबाद इथं पुनरुच्चार केला. त्या हैद्राबाद मधल्या नारायणम्मा विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेच्या रजत जयंती समारंभात बोलत होत्या.
शैक्षणिक तंत्रज्ञानाचं आधुनिकीकरण करण्यासाठी अभियांत्रिकी शाखा महत्वाची भूमिका बजावू शकते असं मुर्मू यावेळी म्हणाल्या. समस्यांचं निराकरण करण्यासाठी अभियांत्रिकी हा पेशा आपल्या कल्पनेपलीकडचं सामर्थ्य दाखवू शकतो असंही मुर्मू म्हणाल्या. देशाचे नागरिक, दुर्बल वर्ग, आणि दिव्यांग जनांचं जीवन सुकर बनवण्याकरता अभियांत्रिकीच्या माध्यमातून उपाय सुचवण्याचं आव्हानही मुर्मू यांनी यावेळी केलं.