मुंबई (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण न करता त्यांच्यासाठी असलेल्या चांगल्या योजनांना विरोधकांनीही समर्थन द्यावं, असं आवाहन कृषी मंत्री मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत आज केलं .
आगामी काळात शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही यासाठी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत, आणि पुढील काळात शेतकऱ्याच्या जीवनात आमूलाग्र बदल होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.’मागेल त्याला’ योजनेमध्ये लॉटरी पद्धत बंद करून जशी जशी शेतकऱ्यांची कागदपत्र मंजूर होतील , तसा त्याला या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
विधानपरिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांनी स्वतंत्रपणे मांडलेल्या शेतकरी आणि त्यासंदर्भातील प्रश्नांसंदर्भात झालेल्या चर्चेला आज सकाळच्या सत्रात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज उत्तर दिलं.