नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली विधानसभेचं दोन दिवसांचं अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. या अधिवेशनात दिल्ली सरकार, ‘दिल्ली कौशल्य आणि उद्यमशीलता विद्यापीठ विधेयक’ तसंच दिल्ली क्रीडा विद्यापीठ विधेयक मांडणार आहे.
तर विरोधी पक्ष भाजपा शहरातल्या वायू आणि जल प्रदूषण मुद्द्यावरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करेल.






