नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाभियोगाअंतर्गत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरचे आरोप निश्चित करण्यासाठी, अमेरिकी काँग्रेसची समिती आज डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरच्या महाभियोग चौकशी अहवालाचा आढावा घेणार आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये बंद दाराआड आणि सार्वजनिकरित्या सुनावणी घेत असलेली समिती या चौकशी अहवालावर चर्चा करेल. येत्या मंगळवारपर्यंत या अहवालावर चर्चा आणि नंतर मतदान होण्याची शक्यता आहे. त्यानंतर सभागृहाची गोपनीय चौकशी समिती महाभियोगाअंतर्गत आरोपांची निश्चिती करेल.