मुंबई (वृत्तसंस्था) : मातृभाषेतल्या शिक्षणामुळे मुलांच्या संकल्पना अधिक चांगल्या रितीनं स्पष्ट होतात, त्यामुळे मुलांना मराठी माध्यमातूनच शिकवायला हवं, असा सूर मुंबईत पार पडलेल्या मराठीप्रेमी पालक महासंमेलनात उमटला.

मराठी अभ्यास केंद्र आणि परळच्या आर.एम.भट शाळेच्या संयुक्त विद्यमानं १४ आणि १५ डिसेंबरला हे संमेलन पार पडलं. मुलांमधली इंग्रजीची भिती दूर करणं पालकांची जबाबदारी आहे, मत अभिनेता सुमित राघवन यांनी संमेलनातल्या एका सत्रादरम्यान मांडलं.

मराठी शाळांचं सक्षमीकरणाच्या उद्देशानं या संमेलनाचं आयोजन केलं होतं.