नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : या महिन्याच्या अखेरपर्यंत पॅन नंबर आधारला जोडणं अनिवार्य असल्याचं प्राप्तीकर विभागानं म्हटलं आहे. या जोडणीमूळे प्राप्तीकर सेवेचे लाभ मिळवणं सोपं होईल.

यापूर्वी या जोडणीची मुदत 30 सप्टेंबर होती. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं ही तारीख 31 डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. इ-फायलींगच्या पोर्टलमधे लॉग इन करुन अथवा एस.एम. एस. द्वारे पॅन नंबर आधारशी जोडण्याची सुविधा प्राप्तीकर विभागानं उपलब्ध करुन दिली आहे.