नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजधानी दिल्लीच्या ओखला, जामिया, न्यु फ्रेंड्स कॉलनी आणि मदनपूर खादर परिसरातल्या सर्व शाळा आज बंद राहणार आहेत.

या भागातली सद्य परिस्थती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचं दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी म्हटलं आहे. दरम्यान, जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात काल झालेल्या निदर्शनादरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या 50 विद्यार्थ्याना सोडून देण्यात आलं आहे.

यापैकी 35 विद्यार्थ्यांना कालकाजी पोलिस ठाण्यात तर 15 जणांना न्यु फ्रेंड्स कॉलनी पोलिस ठाण्यात ठेवण्यात आलं होतं, असं वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी सांगितलं.