नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अभियांत्रीकीच्या विदद्यार्थ्यांनी यशाबद्दलचं पारंपरिक मत सोडून उद्योजकतेकडे वळावं असं मत केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केलं. ते काल नवी दिल्लीतल्या आय.आय. टी मधल्या इंडियन इन्स्टीट्युट ऑफ केमीकल इंजिनिअरिंग इथं 72 व्या वार्षिक संमेलनात बोलत होते.

नवीन उपक्रमांशिवाय कोणत्याही देशाची प्रगती शक्य नाही. उद्योजकतेला प्राधान्य देणं हे भाजपा सरकारचं मुख्य उद्दिष्ट आहे असं प्रधान यावेळी म्हणाले. भारतामधे नवीन आव्हानांना तोंड देण्याचे बौद्धीक सामर्थ्य आहे.  आय.आय.टी सारख्या संस्था शैक्षणिक श्रेष्ठतेची पैदास करणारी प्रमुख केंद्रं आहेत.

देशाला या संस्थांचा अभिमान आहे. भारत नव्या आकांक्षाचा देश असून देशातल्या वैज्ञानिक समुहानं तरुणांच्या आकांक्षाकडे लक्ष द्यावं असंही प्रधान यांनी सांगितलं.