नागपूर :  विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ‘सुयोग’ पत्रकार निवास येथे भेट देऊन पाहणी केली व पत्रकारांशी संवाद साधला.

प्रारंभी शिबीर प्रमुख महेश पवार व सहशिबीर प्रमुख नेहा पुरव यांनी स्वागत केले. विधिमंडळ अधिवेशनासाठी सहा दिवसांचा अवधी मिळाला असला तरी या काळात अधिकाधिक कामकाज चालविण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी यावेळी सांगितले. तसेच यंदा अधिवेशनाचा वेळ कमी असला तरी पुढील वर्षापासून नागपूर कराराप्रमाणे पूर्णवेळ अधिवेशन चालले पाहिजे, अशी आमची भूमिका आहे, असे अध्यक्ष श्री. पटोले यांनी सांगितले.

सामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा होऊन त्यांच्या समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी अधिवेशनातील वेळेचा सदुपयोग करण्यावर आमचा भर आहे, असे श्रीमती गोऱ्हे यावेळी म्हणाल्या.