नवी दिल्ली : भारतीय रेल्वे स्थानक विकास महामंडळाने फ्रेंच रेल्वे आणि एएफडी या फ्रेंच संस्थेबरोबर 10 जून रोजी त्रिपक्षीय करार केला आहे. रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगाडी, फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जीन बाप्टिस्ट लिमोने आणि फ्रान्सचे भारतातले राजदूत अलेक्झांडर झिगलर उपस्थित होते.

या कराराअंतर्गत एएफडी ही संस्था भारतीय रेल्वे स्थानक विकास महामंडळाला रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी 7 लाख युरोपर्यंत सहाय्य उपलब्ध करुन देणार आहे. भारतीय रेल्वे किंवा रेल्वे विकास महामंडळावर याचा आर्थिक बोजा पडणार आहे.

भारत आणि फ्रान्स दरम्यान रेल्वे क्षेत्रात दीर्घकालीन दृढ संबंध आहेत. या करारामुळे भारताला आपली स्थानकं जागतिक दर्जाची बनवण्यात मदत मिळेल असे रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगाडी म्हणाले.