नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इस्त्रायली नागरिकांना सौदी अरेबियात यायची परवानगी नाही, यासंदर्भातली घोषणा सौदी अरेबियानं काल केली. मुस्लिम आणि ज्यु नागरिकांना धार्मिक आणि व्यापारी भेटीवर सौदी अरेबियाला जाण्याचा अधिकार आहे, असं रविवारी इस्रायलच्या गृहमंत्रालयानं सांगितलं होतं.
मुस्लिम धर्मियांचं पवित्र स्थळ असलेल्या सौदी अरेबियात इस्त्रायली नागरिकांचं स्वागत नाही असं सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री शहजादा फैसल बीन यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं होतं. अन्य अरब राष्ट्रांप्रमाणेच इस्रायलचे सौदी अरेबियाशी राजनैतिक संबंध नाहीत.