नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एअर इंडियातले आपले शंभर टक्के समभाग विकण्यासाठी केंद्र सरकारनं निविदा मागवल्या आहेत. याबाबतचं प्राथमिक निवेदन काल सरकारनं जारी केलं. त्यात बोलीदारांना स्वारस्यपत्र सादर करण्यासाठी १७ मार्चपर्यंत मुदत दिली आहे.
एअर इंडियाचे शंभर टक्के समभाग, तर ए.आय.एस.ए.टी.एस या संयुक्त प्रकल्पातले ५० टक्के समभाग विकणार असून, यशस्वी बोलीदाराकडे या विमान कंपनीचं व्यवस्थापन नियंत्रण हस्तांतरित केलं जाणार आहे.