नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या मादागास्करला भारतानं मदतीचा हात दिला आहे. मदतसाहित्य घेऊन भारताची आय.एन.एस ऐरावत ही नौदल नौका रवाना झाली आहे.

याअगोदर मदतीसाठी ओपी व्हॅनीला या नौकेला पाठवण्यात आलं आहे. राष्ट्रीय आपत्तीच्या या क्षणाला भारत, मादागास्करला मदत करण्यासाठी ठाम उभा आहे, असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.

गेल्या आठवड्यात, मादागास्कारला वादळाचा तडाखा बसला. भूस्खलन आणि पूरपरिस्थितीमुळे तिथे अनेक जणांचा मृत्यू झाला आहे, तर कित्येकजण बेपत्ता आहेत.