नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेपाळमधे सुरु असलेल्या १३ व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय पुरुष व्हॉलीबॉल संघाचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. काठमांडूमधल्या दशरथ रंगशाला इथं हा सामना खेळला जाईल.

महिला संघाचा नेपाळबरोबर संध्याकाळी अंतिम सामना होईल. भारतीय महिला संघानं साखळी सामन्यात नेपाळचा पराभव केला असला तरीही, त्यांना नेपाळी महिलांनी चुरशीची लढत दिली होती, बॅडमिंटनमधे भारतीय महिला आणि पुरुष संघ अंतिम फेरीत दाखल झाला आहे.

उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय पुरुष आणि महिला संघानी पाकिस्तानचा पराभव केला. तर श्रीलंकेच्या महिला आणि पुरुष संघानं उपांत्य सामन्यात नेपाळचा पराभव केला.