नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पृथ्वीवरील सर्वात उंच ठिकाणी फॅशन शोचं आयोजन केल्याबद्दल नेपाळचं नाव गिनीज बुकात नोंद झालं आहे. पाच हजार ३४० मीटर उंचीवरील एवरेस्ट शिखराच्या छावणीजवळ रविवारी या शोचं आयोजन केलं गेलं.

दहा देशातल्या १८ सुपर मॉडल्स या फॅशन शोमधे सहभागी झाल्या होत्या. ‘नेपाळला भेट द्या’ या नेपाळ सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेचा हा शो एक भाग होता. या शोचे आयोजकांना गिनीज बुकतर्फे प्रमाणपत्रं देण्यात आली.