नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फरिदाबाद इथं ३४ व्या सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तव्यवसाय मेळ्याचं उद्धाटन करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज हरयाणाला भेट देणार आहेत.

उझबेकिस्तान या मेळ्यात भागीदार देश असून, हिमाचल प्रदेश या राज्याच्या संकल्पनेवर मेळा आधारित आहे.

१९८७ पासून सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तव्यवसाय मेळ्याचं आयोजन होत असून, याद्वारे हस्तव्यवसाय, हातमाग आणि भारताचा सांस्कृतिक वारसा तसंच यातील विविधता जगासमोर मांडली जाते.