पिंपरी : चिंचवड देवस्थान ट्रस्ट व जस्ट फॉर हार्टस् यांच्या संयुक्त विद्यमानाने ‘माझे आरोग्य, माझी जबाबदारी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. सर्व आजारांवर योग्य मार्गदर्शन केले जाणार असून मोबाइलद्वारे कन्सल्टिंग घरच्या घरी उपचार घेण्याची संधी मिळणार आहे. वेळोवेळी मार्गदर्शन करून आरोग्याची योग्य काळजी घेण्याचे काम संस्थेमार्फत केले जाईल. याबाबतची माहिती चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार देव महाराज, जस्ट फॉर हार्टस् चे प्रमुख डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी दिली.

माझे आरोग्य माझी जबाबदारी या उपक्रमाची सुरुवात आजपासून होणार आहे. लोकांना आरोग्य विषयक असलेले बरेच प्रश्न, त्याची योग्य ती उत्तरे त्यांना मिळतील. यामध्ये वैद्यकीय तपासणीसाठी येणार्‍या प्रत्येक व्यक्तीचे रेकॉर्ड ठेवण्यात येणार आहे. तसेच असणा-या आजारा संदर्भातील प्रत्येक गोष्टीचे त्याला मार्गदर्शन केले जाईल. आहार-व्यायाम व नियमित झोप तसेच जीवनशैलीचे बारकावे यामुळे शरीरावर होणारे परिणाम या संदर्भातील संपूर्ण माहिती. वेळोवेळी मार्गदर्शन करून आरोग्याची योग्य काळजी घेण्याचे काम संस्थेमार्फत केले जाईल.

असणार्‍या आजाराबाबत वेळीच मार्गदर्शन याठिकाणी केले जाईल. आरोग्याची कुंडली/आरोग्याचे ऑडिट/आरोग्याची प्रगतिपुस्तक एका क्लिकवर मिळण्याची सोय येथे उपलब्ध करण्यात येणार आहे. एका मोबाइल अँपद्वारे आपल्याला आपल्या घरच्या घरी वजन – बीपी -शुगर पल्स ऑक्सिजन यांसारख्या साध्या तपासण्या करून अँपमध्ये नोंदवू शकता, असे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.