नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी काल नवी दिल्लीत आपल्या निवासस्थानी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. अर्थसंकल्पात राज्यसभेचं कामकाज सुरळीत चालवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं, असं आवाहन त्यांनी केलं.

संसदेकडून अर्थसंकल्पाला मंजुरी मिळण्यापूर्वी विविध मंत्रालयांनी विभागीय स्थायी समित्यांच्या माध्यमातून अनुदान मागणीबाबतचे आपले अहवाल सादर करावेत, अशी सूचना नायडू यांनी केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनातल्या चर्चेदरम्यान जनहिताच्या अनेक व्यापक मुद्यांवर चर्चा करायला ब-याच संधी उपलब्ध होतात असंही नायडू यांनी सांगितलं.