नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेत्री रहेमान यांना आज मध्यप्रदेश सरकारकडून दिला जाणारा किशोर कुमार पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबईत वहीदा रहेमान यांच्या निवासस्थानी मध्यप्रदेशच्या सांस्कृतिक मंत्री विजय लक्ष्मी साधो यांनी पुरस्कार दिला. प्रशस्तिपत्र आणि दोन लाख रुपये असं या पुरस्काराचे स्वरुप आहे.
वहीदा रहेमान यांनी पुरस्काराबद्दल मध्यप्रदेश सरकारचे आभार मानले आहेत.