नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज जागतिक कर्करोग दिन आहे. या निमित्तानं आज संपूर्ण जगात विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जात आहे. उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आरोग्य क्षेत्रातल्या सर्व तज्ज्ञांना या रोगाच्या नियंत्रणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं आहे.

कर्करोगासंदर्भात जागरूकता यावी, म्हणून आजच्या दिवशी  सर्वत्र जागतिक कर्करोगदिन पाळला जातो. आरोग्य क्षेत्रात कमी गुंतवणुकीमुळे अविकसित देशात २०४० पर्यंत कर्करोगाचं प्रमाण ८१ टक्क्यांनी वाढण्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे.

या देशांमध्ये आजही कर्करोगामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या जास्त आहे, असंही जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.