नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जी-सेव्हन या आघाडीच्या सात औद्योगिक देशांच्या गटानं जागतिक आरोग्य संघटना, युरोपीय संघ आणि चीनसोबत काम करायची तयारी दाखवली आहे.
या संकटाला तोंड देण्यासाठी स्वतंत्रपणे केलेले प्रयत्न उपयोगाचे ठरणार नाहीत, असं मत या देशांनी व्यक्त केलं असून, जर्मनी, ब्रिटन आणि फ्रान्सच्या आरोग्यमंत्र्यांची बैठक आज होण्याची शक्यता आहे.
या बैठकीत ते प्रवास नियंत्रण, प्रतिबंधात्मक उपाय आणि या विषाणूसंदर्भातल्या संशोधनासाठीच्या प्रयत्नांमधे समन्वय साधण्याबाबत प्रयत्न करतील. आतापर्यत चीनमधे २० हजार ५०० तर इतर देशांमधे १९२ लोकांना या विषाणूची बाधा झाली आहे. कोरोना विषाणूनं ४२७ जणांचा बळी घेतला आहे. त्यापैकी ४२५ जण चीनमधले होते.