नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बोडो करारावर स्वाक्षरी झाल्यानिमित्त आसाममधे कोक्राझार इथं येत्या सात तारखेला होणा-या समारंभाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. चार लाखांहून अधिक लोक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचा अंदाज आहे.
राज्यातील वांशिक वैविध्याचं दर्शन घडवण्यासाठी आसाम सरकारनं एका सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. ऐतिहासिक बोडो करारानिमित्त आयोजित या समारंभाला प्रधानमंत्री संबोधित करणार आहे. नवी दिल्ली इथं २७ जानेवारीला या करारावर स्वाक्ष-या करण्यात आल्या.