नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ५६४वर गेली आहे. या विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांची संख्याही 28 हजार ६० वर पोचली आहे. चीनबाहेर या विषाणूच्या बळींची संख्या २०० वर गेली आहे. विषाणू प्रतिबंधक रेमडेसिवीर औषध लवकरच चीनमधे पोचेल.
कोरोना विषाणूवर त्याचा परिणाम आजमावण्यासाठी त्याची चाचणी घेतली जाईल, असं चीनच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं सांगितलं. इबोला प्रादुर्भावाच्या या औषधाचा उपयोग झाला होता. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं ६७ कोटी ५० लाख अमेरिकी डॉलर्सची मोहिम सुरु केली आहे.