नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हॉलिवुडचे जगप्रसिद्ध  ज्येष्ठ अभिनेते  किर्क डगलस यांचं आज कॅलीफोर्नियात बेवर्ली हिल्स इथं वार्धक्यानं निधन झालं. ते १०३ वर्षांचे होते. त्यांचा जन्म न्यूयार्क इथं १९१६ मधे झाला.

हॉलिवूडच्या सुवर्ण युगात त्यांनी प्रसिद्धीचं शिखर गाठलं होतं १९४० ते २००० या सहा दशकांच्या कारकीर्दींत डगलस यांनी ९० पेक्षा जास्त चित्रपटांमधे काम केलं, आणि चार ऑस्कर पुरस्कार पटकावले. त्यांनी केलेली स्पार्टाकसची भूमिका अविस्मरणीय ठरली.