नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरातल्या कोरोना रुग्णांची संख्या आठवड्याभरात एक कोटी पर्यंत पोहचेल असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे. अमेरिकेतल्या दक्षिण, उत्तर आणि मध्य भागातल्या अनेक ठिकाणी अजूनही कोरोनाचा प्रसार रोखण्यात अपयश येत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालिन कार्यक्रम विभागाचे कार्यकारी संचालक माईक रायन यांनी म्हटलं आहे. परवा एका दिवसात जगभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या १ लाख ३३ हजारानं वाढली.