नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीत शाहीन बाग इथं सुरु असलेल्या निदर्शनांच्या विरोधात दाखल झालेल्या याचिकांची सुनावणी सर्वोच्च न्यायालय येत्या सोमवारी करणार आहे.

आजच या प्रकरणी सुनावणी घेऊन दिल्ली विधानसभा निवडणुकांवर त्याचा परिणाम होऊ देण्याची आपली इच्छा नसल्यानं येत्या दहा तारखेला सुनावणी करणार असल्याचं न्यायमूर्ती एस के. कौर आणि के.एम. जोसेफ यांच्या पीठांन सांगितलं.

यात लोकांना येणार्‍या समस्येची आपल्याला जाणीव आहे, आणि ती कशी सोडवता येईल, याचा विचार आपण करु, असं न्यायालयानं सांगितलं. हे प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयाकडे परत का पाठवू नये याबाबत युक्तीवाद करण्यासाठी तयारी करुन सोमवारी यावं, असं न्यायालयानं याचिकाकर्त्यांना सांगितलं.