नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मार्टीना फिल्म्स, जगुआर एंटरटेनमेंट आणि इतर दोन सहनिर्मात्यांनी भारतातील पाच वेगवेगळया चित्रपट प्रकल्पांमध्ये शंभर कोटी डॉलर्सची गुंतवणूक केल्याबद्दल माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आनंद व्यक्त केला आहे.

आज डॉ ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या आयुष्यावर आधारित चरित्रपटाचा फर्स्ट लुक नवी दिल्लीत माध्यमांसाठी जारी केल्यानंतर ते  बोलत होते.

छत्रपती शिवाजी महाराज आणि पहिल्या भारतीय स्वातंत्र्यलढ्यावरील चित्रपटांचा यात समावेश आहे. हा चित्रपट हॉलीवुड आणि टॉलीवुडचा संयुक्त उपक्रम असून या वर्षाअखेरीला तो प्रदर्शित केला जाणार आहे.