नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेचे प्रधानमंत्री महिंदा राजपक्षे यांनी आज बोधगया इथल्या महाबोधी मंदिरात पूजा-अर्चना केली. याच ठिकाणी भगवान बुद्धांनी ज्ञानप्राप्ती केली होती. मंदिर परिसरात असलेल्या बोधी वृक्षाखाली बसून त्यांनी ध्यानही केले.

यावेळी त्यांच्यासह उच्चस्तरीय प्रतिनिधीमंडळ उपस्थित होते. महाबोधी मंदिराचा युनेस्कोच्या जागतिक सांस्कृतिक वारशाच्या सूचीमधे समावेश आहे.